"दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" - तरुणांपुढील आवाहन


"दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" या संदर्भातील बोधकथा लहानपणापासूनच आपण सर्वांनी ऐकलेली आहेच. पण याचा नेमका अर्थ काय आणि आजच्या परिस्थितीत सुद्धा कोणीतरी तिसरा लाभार्थी त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. याचे भान आपल्याला राहिलेले नाही असे दिसते.

आम्ही खूप शिकलो, आम्हाला खूप कळायला लागले, तंत्रज्ञान आम्ही शिकलो, पण ही साधी शाळेत असतानाची गोष्ट आम्ही विसरलो. गोष्ट माहीत आहे हो, त्याच्यातून जे शिकायचं होत ते मात्र आम्ही विसरलो.
आपण सगळे म्हणतो, की आम्ही भारतीय खूप शुर आहोत, बलाढ्य आहोत, हुशार आहोत, आणि ठरलव तर काहीही करू शकतो. येथे गुणवंतांचा कमी नाही, येथे पैशाची कमी नाही, येथे कलाकारांची कमी नाही. फक्त आम्ही एकत्र आलो पाहिजे. आम्ही काहीही करून दाखवू शकतो. हो नं?

आम्ही एकत्र येण्याची गरज आहे, म्हणजे आम्ही अजूनही विभागलेले आहोत, विघटित आहोत. धर्म, जात, प्रांत, भाषा, पेहराव, परंपरा, श्रध्दा या गोष्टींपेक्षा जास्त तर आम्ही विचाराने विभागलेले आहोत. अलीकडच्या काळात जातीय मतभेद, धार्मिक वादामुळे यामध्ये भर पडून आम्ही अजून दुरावले गेलो. आता त्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  तरुण पिढीवर याचा सर्वात जास्त परिणाम झालेला दिसतो. तरुण अवस्थेमध्ये माणसाच्या अंगात सर्वात जास्त शक्ती, गती आणि युक्ती असते. ही प्रकृती आहे पण या प्रकृतीचा विकृती मध्ये रुपांतर व्हायला नको. म्हणजेच त्या गोष्टींचा योग्य वापर होणे महत्त्वाचे.

आता दोघांच्या भांडणामधील हा तिसरा लाभार्थी कोण? याचा विचार करू. ज्या ज्या वेळी आम्ही विभागले गेलो त्या त्या वेळी आम्ही संकटात सापडलो. हे इतिहासावरून सुद्धा आम्ही सांगू शकतो. अनेक परकीय शत्रूंनी जसे की मुघल, इंग्रज, इराणी, अफगाणी, इत्यादींनी आमच्या विघटित समाजाचा फायदा घेतला आणि आमच्यावर हल्ले चढवले आणि यशस्वी सुद्धा झाले. आधीच्या काळात हे सर्व परकीय शत्रू तिसरे लाभार्थी ठरले. आणि आजच्या काळात विचार केला तर, परिस्थिती पूर्वी पेक्षा भयानक दिसत आहे. कारण पूर्वीच्या शत्रूंची ओळख तरी आम्हाला होती जेणेकरून आम्ही त्यांच्यावर मत करू शकलो. आता तर हे तिसरे लाभार्थी, शत्रू सगळे आमच्याच देशातील, समाजातील लोक आहेत.

देशात राहून देशाला लुटणारे, समाजाला विघटित करणारे, मतभेद पसरविणारे, भ्रष्टाचार करणारे, देशात अराजकता पसरविणारे, राष्ट्रीय एकात्मता भंग करणारे, तरुण शक्तीचा अयोग्य वापर करणारे, हे खरे आज आमचे शत्रू आहेत.  प्रामुख्याने राजकारणातील स्वार्थी आणि अपात्र नेते, धर्मांध कट्टरपंथी, समाजात फूट पाडणारे पुढारी आणि सर्वात महत्त्वाचा वर्ग म्हणजे या लोकांचे डोळे मिटून अविचारीपणे अनुसरण करणारे, ऐकणारे लोक. यामध्ये प्रामुख्याने तरुण पिढीचा समावेश होतो.

आपण आजही एवढे विखुरलेले, विभागलेले, विघटित आहोत की, एखाद्या समाजकंटकाने जातीय विषयक वा धार्मिक बाबीचा आधार घेऊन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही झालेल्या घटनेच्या विरोधासाठी  एकमेकांविरोधात युद्ध पातळीवर अंधपणे उभे राहायला मागे वळून पाहत नाही.  हीच का आमची राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकोपा?

आज आपला देश हजारो समस्यांनी वेढवलेला आहे. त्याची यादी करायची झाली तर ती संपणार नाही. पण त्यांच्याकडे लक्ष देण्याकडे आम्हाला वेळ कुठे? आम्ही तर आजही जातीयवाद, भेदाभेद, उच्च नीच्च, लहान मोठा, श्रीमंत गरीब, मीडिया, सोशल नेटवर्क अशा गोष्टींमध्ये व्यस्त आहोत.

खरच परिस्थिती बदलायची असेल तर, आम्हाला सर्वात पाहिले आपले भेदाभेद विसरून, द्वेष संपवून बंधुत्वाने एकत्र यावं लागेल. नाहीतर ज्या वेगाने समाजात सध्या कटुता आणि  द्वेष वाढत आहे. ती वेळ दूर नाही जेव्हा प्रत्येक समाज आपल्या स्वातंत्र्य मागण्यांसाठी युद्ध पुकारल्यासारखं रस्त्यावर दिसेल.

त्यानंतर जे स्वार्थी आणि लबाड लाभार्थी आमच्या तरुण शक्तीचा गैरवापर करू इच्छिता त्यांना धुडकावून लावावं लागेल.  कोणतेही बदल करण्याची शक्ती तरुण वर्गामध्ये आहे. ते मग चांगले असो वा वाईट. समाजाच्या, देशाच्या उज्वल भविष्यासाठी आज संपूर्ण भारतातील तरुणांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ती म्हणजे योग्य नेतृत्वाची निवड करण्याची आणि ज्या गोष्टींमुळे आम्ही विघटित होत आहोत, विभागले जात आहोत त्या गोष्टींचा त्याग करण्याची.

आमच्या शक्तीचा कोणी गैरवापर तर कोणी करत नाही ना? हा प्रश्न प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारला पाहिजे. त्याचप्रमाणे समाज कशा पद्धतीने एकत्र राहील यासाठी कार्यशील राहील पाहिजे.


© रोहन व्यंकटेश श्रीरामवार, ०७.०९.२०१८


Comments

  1. Correct Rohan.....I agree with u.

    ReplyDelete
  2. Titanium Hammers & Ganesha - TITIAN HABANERO
    These are the ultimate hammers for you! titanium dog teeth These can be used as a titanium nose jewelry sauna, titanium nipple jewelry as an ashram pure titanium earrings or as titan metal an escape to any other place. The head of the

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोर पुरुषांची जयंती की त्यांच्या विचारांची पुण्यतिथी?

दुःख : एक भावना