Posts

एक वैतागलेला औरंगाबादकर

Image
कधी काळी आशिया खंडातील सर्वात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद शहर आज निष्क्रिय नेत्यांमुळे आणि प्रशासनामुळे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये दिसत आहे. आज माझ्या औरंगाबाद शहराची ओळख धुळीने माखलेल शहर, खड्ड्यांच शहर, कचऱ्याने ग्रासलेल शहर, दंगलीमुळे वादग्रस्त झालेल शहर, अशा इत्यादी नकारात्मक गोष्टीमूळे नेहमी वादात राहणार शहर म्हणून ओळखला जात आहे. जे शहर भौगोलिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. ज्या शहरांमध्ये उद्योजकतेसाठी आणि प्रगतीसाठी खूप जास्त वाव आहे. जेथे अत्यंत प्राचीन अशा ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्राचीन वास्तु आहेत. जे शहर निसर्गरम्य डोंगरांनी वेढलेलं आहे. ज्या शहराला पाण्यासाठी प्रचंड मोठे जयकवाडी धरण आहे. तसं पाहिलं तर या माझ्या शहराला भौगोलिक दृष्ट्या कोणतेही नैसर्गिक हानी नाही. या माझ्या शहराला अत्यंत मेहनती खेळाडू, कलावंत, लेखक, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनीयर, आर्किटेक्चर, इत्यादी क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणारे  असे बहुगुणी नागरिक लाभलेले आहेत. जे या शहराचे नाव मोठे करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. पण अशा बहुगुणी नागरि...

दुःख : एक भावना

Image
दुःख, दर्द, पेन (pain)  सर्वांना होत काहींना प्रेम भंग झाल्याने होत काहींना न मिळणाऱ्या प्रेमामुळे काहींना मन तुटल्यावर होत काहींना मन न जुळल्यामुळे काहींना कोणी भेटल्यावर होत काहींना कोणी न भेटल्यावर काहींना आपले दूर गेल्याने होत काहींना असलेले दूर न गेल्याने काहींना एखाद्याची आठवण आल्यावर होत काहींना आपली आठवण न आल्याने काहींना कोणी जवळ असल्याने होत काहींना कोणी जवळ येत नसल्याने काहींना अपेक्षा पूर्ण न झाल्याने होत काहींच्या अपेक्षा न संपल्याने काहींना समजून घेणार नसल्याने होत काहींना समजण्याची इच्छा नसल्याने काहींना कोणी बोलल्याने होत काहींना बोलायला कोणी नसल्याने काहींना काही मिळाल्यावर होत काहींना काही न मिळाल्यामुळे पण काहींना थोड होत काहींना जास्त काही दाखवतात काही लपवतात काही गिळून टाकतात काही धरून ठेवतात काही तुटतात काही सावरतात काही बोलून दाखवतात काही मनात ठेवतात काही सहन करतात काहींना होत नाही काही त्यामुळे धैर्य कमवतात काही त्यामुळे कमजोर पडतात अशाही परिस्थितीत आनंदी तोच...

"दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" - तरुणांपुढील आवाहन

Image
"दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" या संदर्भातील बोधकथा लहानपणापासूनच आपण सर्वांनी ऐकलेली आहेच. पण याचा नेमका अर्थ काय आणि आजच्या परिस्थितीत सुद्धा कोणीतरी तिसरा लाभार्थी त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. याचे भान आपल्याला राहिलेले नाही असे दिसते. आम्ही खूप शिकलो, आम्हाला खूप कळायला लागले, तंत्रज्ञान आम्ही शिकलो, पण ही साधी शाळेत असतानाची गोष्ट आम्ही विसरलो. गोष्ट माहीत आहे हो, त्याच्यातून जे शिकायचं होत ते मात्र आम्ही विसरलो. आपण सगळे म्हणतो, की आम्ही भारतीय खूप शुर आहोत, बलाढ्य आहोत, हुशार आहोत, आणि ठरलव तर काहीही करू शकतो. येथे गुणवंतांचा कमी नाही, येथे पैशाची कमी नाही, येथे कलाकारांची कमी नाही. फक्त आम्ही एकत्र आलो पाहिजे. आम्ही काहीही करून दाखवू शकतो. हो नं? आम्ही एकत्र येण्याची गरज आहे, म्हणजे आम्ही अजूनही विभागलेले आहोत, विघटित आहोत. धर्म, जात, प्रांत, भाषा, पेहराव, परंपरा, श्रध्दा या गोष्टींपेक्षा जास्त तर आम्ही विचाराने विभागलेले आहोत. अलीकडच्या काळात जातीय मतभेद, धार्मिक वादामुळे यामध्ये भर पडून आम्ही अजून दुरावले गेलो. आता त्याचे प्रमाण वाढत चालले आहे.  तरुण...

थोर पुरुषांची जयंती की त्यांच्या विचारांची पुण्यतिथी?

Image
आपल्या देशामध्ये अनेक थोरपुरुष, युगपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर, समाजसुधारक, समाजप्रबोधक होऊन गेलेत. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी, कल्याणासाठी, समाज सुधारणेसाठी, समाज प्रबोधनासाठी, देशाच्या हितासाठी, धर्म रक्षणासाठी पणाला लावले/ खर्च केले. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत व त्यांच्याबद्दल वाचत आहोत. या आपल्या सर्व थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम, समारंभ, शोभायात्रा, रॅली, मिरवणूक, दिंडी, सभा, पथनाट्य, इत्यादी आयोजित केले जातात. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट आपल्या सर्वांना महितीतीच आहे की, सर्व थोर पुरुषांचे आपणाला पुण्यस्मरण व्हावे, त्यांनी केलेल्या कार्याची आम्हाला जाणीव असावी, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांना आदर असावा, त्याच्या कर्तुत्वाला पाहून आम्हीसुद्धा त्यांच्याकडे असलेले चांगले गुण आत्मसात करावे आणि आम्ही सुद्धा देशाचे सृजन नागरिक व्हावे व आमच्या हातून सुद्धा समाजकार्य, देशकार्य घडावे. सर्व थोर पुरुषांच्या कार्याचा विचार केला तर असे दिसून येते की, समकालीन समाजातील स्थितीचा त्यांनी निरिक्षणप...

MILLIONS OF PEOPLE WATCH BIOPIC MOVIES ON SPORTS, BUT WHAT ABOUT REAL MATCHES?

Image
MILLIONS OF PEOPLE WATCH BIOPIC MOVIES ON SPORTS, BUT WHAT ABOUT REAL MATCHES? The number of BIOPIC MOVIES ON SPORTS are increasing day by day. That's good thing! Because many people who were unfamiliar with sports and sportsmen are getting closer to the sports. As a result, it is helping to develop and nurture the culture of sports. Now everyone is aware about advantages of sports. The people who were opposing to the sports now started supporting.  When we talk about sports and players some may think about Fame, Money, Medals, Victory Cup and Publicity. But when we see from the Player’s point of view, we can realise their Hard work, Injuries, Sacrifices, Defeat, Persistence, Fluctuations, Lack of financial support and Adverse conditions. A good quality of the person could lead to the best sportsmen. Even if the situation is unfavourable, the attitude of not giving up takes him forward. To participate in the competitions, Sportsmen need to learn the art ...

खेळ आणि सिनेमा

Image
खेळाडूवर सिनेमा बनतो तेव्हा लाखो लोक ते पाहतात , पण खऱ्या स्पर्धांबद्दल काय ? अलीकडच्या काळात खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमा बनण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत . खूप चांगली गोष्ट आहे . त्यामुळे अनेकांना अपरिचित असलेले खेळ आणि खेळाडू परिचयाचे होत आहेत व खेळाची संस्कृती रुजू होण्यास मदत होत आहे . खेळाचे जीवनात किती फायदे आहेत हे आता सर्वांना लक्षात येत आहे , त्यामुळे पूर्वी ज्याप्रमाणे खेळण्यास विरोध केला जायचा तो कमी होताना दिसतोय . खेळ आणि खेळाडू म्हणल की जिंकण , फेम , पैसा , पदक , व्हिक्ट्री कप , प्रसिध्दी या गोष्टी सहज लक्षात येतात . पण खेळाडूच्या दृष्टीने पाहिलं तर कठोर परिश्रम , मेहनत , हार , सातत्य , जिद्द , दुखापत , जखम , चढ उतार , आर्थिक पाठबळाची कमतरता , प्रतिकूल परिस्थिती या गोष्टी आपल्याला लक्षात येतात . व्यक्तितील एक चांगला गुण खेळासाठी पूरक ठरतो व त्यातून एका खेळाडूचा जन्म होतो . परिस्थिती प्रतिकूल असून सुद्धा मागे न हटण्याची वृत्ती त्याला ...