थोर पुरुषांची जयंती की त्यांच्या विचारांची पुण्यतिथी?

आपल्या देशामध्ये अनेक थोरपुरुष, युगपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर, समाजसुधारक, समाजप्रबोधक होऊन गेलेत. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी, कल्याणासाठी, समाज सुधारणेसाठी, समाज प्रबोधनासाठी, देशाच्या हितासाठी, धर्म रक्षणासाठी पणाला लावले/ खर्च केले. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत व त्यांच्याबद्दल वाचत आहोत. या आपल्या सर्व थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम, समारंभ, शोभायात्रा, रॅली, मिरवणूक, दिंडी, सभा, पथनाट्य, इत्यादी आयोजित केले जातात. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यामागचे उद्दिष्ट आपल्या सर्वांना महितीतीच आहे की, सर्व थोर पुरुषांचे आपणाला पुण्यस्मरण व्हावे, त्यांनी केलेल्या कार्याची आम्हाला जाणीव असावी, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांना आदर असावा, त्याच्या कर्तुत्वाला पाहून आम्हीसुद्धा त्यांच्याकडे असलेले चांगले गुण आत्मसात करावे आणि आम्ही सुद्धा देशाचे सृजन नागरिक व्हावे व आमच्या हातून सुद्धा समाजकार्य, देशकार्य घडावे. सर्व थोर पुरुषांच्या कार्याचा विचार केला तर असे दिसून येते की, समकालीन समाजातील स्थितीचा त्यांनी निरिक्षणप...